युवा उद्योजक कृष्णा चौधरी यांनी निभावले सामाजिक दायीत्व
अंत्ययात्रेतील लोकांना मोफत सॅनिटायझर चे वितरण
वाशीम - ( दि. 02 मे )
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्हयात ३ मे पर्यत असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये शहरातील एका ठिकाणी मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी नातेवाईकांना जिजाऊ उत्पादन कारखान्याचे संचालक कृष्णा चौधरी यांच्या पुढाकारातुन सामाजीक जाणीवेचे भान व सामाजीक अंतराचे नियम पाळून मोफत सॅनिटायझर बाटल्यांचे वितरण ३० एप्रिल रोजी करण्यात आले.
भारतात कोरोनाचा आजाराच्या उद्रेकानंतर हात व शरीराची संपूर्ण स्वच्छता ठेवण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले असल्यामुळे जागरुक नागरीक सॅनिटायझरचा वापर करतांना दिसत आहेत. यामुळे अनेक विक्रेते या संधीचा फायदा घेवून चढ्या भावाने सॅनिटायझरची विक्री करतांना दिसून येत असून बाजारात सॅनिटायझरची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यासोबतच अनेक नागरीकांची खर्चाची एैपत नसल्यामुळे असे नागरीक सॅनिटायझर विकत घेवू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेवून अनेक समाजसेवी नागरीक, संस्था, व्यापारी, कारखानदार आदींनी पुढाकार घेवून नागरीकांना मोफत सॅनिटायझर व मास्कचे वितरण केले आहे. शहरातील शुक्रवारपेठ भागात ३० एप्रिल रोजी एका वृध्देचे वृध्दापकाळाने निधन झाले. यावेळी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेवून वाशीम एमआयडीसी येथील नव्यानेच सॅनिटायझर उत्पादनासाठी पुढाकार घेणार्या जिजाऊ उत्पादन कारखान्याचे युवा उद्योजक कृष्णा चौधरी यांनी आपले सामाजीक दायित्व ओळखून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्याना सॅनिटायझर बाटल्यांचे मोफत वितरण केले. यासोबतच कोरोना आजाराची पार्श्वभूमि, लक्षणे व उपाययोजना समजावून सांगता हात साबणाने वारंवार स्वच्छ धुण्यासोबतच हाताला सॅनिटायझरने निर्जंतुक करण्याबाबत माहिती दिली. कृष्णा चौधरी यांच्या पुढाकारामुळे इतरांपुढे आदर्श निर्माण झाला असून निश्चितच ही बाब नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व कोरोना आजारापासून वाचविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कृष्णा चौधरी यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्यातून स्थानिक एमआयडीसीमध्ये उभारलेल्या स्वच्छताविषयक उत्पादनाच्या कारखान्याला दोन वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त नुकतेच जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी त्यांच्या या उद्योगाची पाहणी करुन चौधरी यांच्या व्यवसायीक कार्याचे कौतूक केले होते. फिनाईल, टॉयलेट क्लिनर, हॅन्डवॉश, डिशवॉश आदी उत्पादने क्लिनआऊट या नावाने विक्रीतून वक्तशिरपणा व सचोटी राखल्यामुळे व सोबतच सामाजीक भान जोपासल्यामुळे जिजाऊ कारखान्याला जिल्हयातून प्रथमच आयएसओ नामांकन मिळाले आहे हे विशेष.