ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने ऊसतोड कामगारांना मदतीचा हात
वाशीम : तालुक्यातील अनसिंग पासून 5 km अंतरावर सोंडा येथील ऊसतोड कामगारांना ग्रामपंचायत च्या निर्णयानुसार शेतात ठेवण्यात आले होते , त्यांना गावात प्रवेश नाकारला होता , इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा त्यांना दुरूनही भेटण्यास सक्त मनाई करण्यात आली होती , जर गावातील कुणी व्यक्ती त्यांना भेटायला जातील तर त्यांना परत गावात येता येणार नाही अशी ताकीद देण्यात आली होती .
विशेष म्हणजे त्यांच्या आरोग्याची कुठलीही काळजी घेण्यात आली नव्हती. असे प्रत्यक्ष भेटीतून समोर आले आहे.
प्राप्त माहिती नुसार, स्थानिक सरपंच यांनी मात्र गहू , डाळ , पाण्याची व्यवस्था आदी मदत केल्याचे पीडितांनी सांगितले. परंतु आरोग्याचा प्रश्न अनुत्तरितच आणि गंभीर होताच .तेंव्हा आमची तपासणी करून आम्हाला गावात प्रवेश द्यावा असे त्यांनी बोलून दाखविले. कारण खाण्यापिण्यापेक्षाही निसर्गाचा प्रकोप भयावह असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. रोजच वादळी वाऱ्यासह येणारा पाऊस , सोबत लहान लहान मूल ' म्हातारी माणसं , सर्वच कस दयनीय अवस्था , अशावेळी समाजमाध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार समता सैनिक दल जिल्हा अध्यक्ष सुरेश इंगोले , प्रा .संदीप भगत यांनी स्वतः पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन केले. याकामी त्यांना संजय डवरे , प्रवीण पेंढारकर , सुभाष गाभने वाशीम , जयसिंग राठोड (म .पो .) धुमका , रिपब्लिकन विचारवंत सुनील टोपे , विनोद टोपे , समीर घाडगे पुणे , , समता सैनिक दल वरिष्ठ सैनिक कांतीलाल भांगे, नितेश वहाने , प्रविन्दा माटे , ज्योत्स्ना वानकर , रंजना वासे , डॉ .अर्पणा सोनटक्के , कमल पोफरे , नागपूर , रीता कांबळे उमरखेड , यांचे आर्थिक सहकार्य लाभले. तसेच राजू कोन्घे तोंडगाव यांनी सतत संपर्कात राहून मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले .
यावेळी पीडितांना संपुर्ण किराणा , सोबतच सेनेटरी pad , वाटप करण्यात आले .आणि लवकरच त्यांची कोविड - 19 आरोग्य तपासणी करून त्यांना गावात त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व ज्यांना जस जमेल तशी मदत करण्याचे आवाहन सुरेश इंगोले यांनी केले आहे.
संपर्क - सुरेश इंगोले
8830966982