कोल्हापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांची सुटका प्रा. अनिल राठोड यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांची सुटका


कोल्हापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांची सुटका


वाशिम : ( दि. 25 एप्रिल ) 
   वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील काही ऊसतोड कामगार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील गावात ऊसतोड ठेकेदाराने अडकवून ठेवले होते.  या मजुरांच्या सुटकेसाठी उपेक्षित वर्गलढ्याचे अमरावती विभागीय संयोजक प्रा. अनिल राठोड धावून आले. आणि त्यांची सुटका करून आणली.


    जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील फुलऊमरी येथील पाच मजूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साईबोरी येथील तेरा मजूर असे अठरा मजूर दरवर्षी प्रमाणे ऊसतोड कामासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बेलेवाडी कळम्मा येथे गेले होते.  सदर मजुरांकडून उसतोडणीचे काम पूर्णत्वास जात असताना राज्यात कोरोना चा शिरकाव झाला. आणि राज्यभर लॉक डाऊन झाले. त्यामुळे मजुरांचे काम बंद झाले. दरम्यान, मजुर लोक आपल्या गावी निघत असतांना या मजुरांचे ठेकेदार असलेल्या माणसाने आर्थिक व्यवहाराचे कारण पुढे करून मजुरांना गावी येण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे मजुरांची घालमेल वाढली. सोबतच पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. 
    सदर मजुरांची व्यथा वाशिम येथील रहिवासी तथा उपेक्षित वर्गलढ्याचे अमरावती विभागीय संयोजक प्रा. अनिल राठोड यांना कळताच त्यांनी संबंधित ठेकेदारास धारेवर धरले. आणि कायद्याची सबब पुढे करून मजुरांची सुटका करण्याचे फर्मान दिले. तसेच संभाजी ब्रिगेड चे वाशिम जिल्हाध्यक्ष गजानन भोयर यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथील संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर रुपेश पाटील यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन त्या ठेकेदारास कायद्याच्या भाषेत समजावून सांगितले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने तात्काळ मजुरांची सुटका केली. आणि मजुरांना स्वगावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर सदर मजूर गुरुवारीच घरी पोहोचले.  प्रा. अनिल राठोड यांच्या पुढाकाराने मजुरांना आपल्या घरी पोहोचता आल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.