रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोरोना आणि उद्भवलेल्या परिस्थिती च्या अनुषंगाने विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. या विद्यालयाचे प्राध्यापक मंगेश भुताडे सरांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांनी आपल्या लेखन कौशल्याला चालणा दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी साप्ताहिक बहुजन शिवनीती ने विद्यार्थ्यांचे लेख प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाग 03
विषय : एक दिवा शेतकऱ्यांसाठी
लेखक : मयुरी प्रवीण अवताडे ( मालेगाव )
या भयान संकटा च्या वेळी कोणीही घराबाहेर निघाला नाही परंतू निघाला तो फक्त शेतकरी, तोच शेतकरी जो अन्न शेतात पिकवतो, तोच शेतकरी जो काही लोकांच्या नजरेत गरीब, शेण उचलणारा,गावावाला,
अडाणी आहे.
आज मोठमोठ्या उद्योगांना टाळे लागले आहेत ,पण शेतकरी बाप असल्यामुळे कोणाच्याही चुलीला टाळा लागला नाही.
माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा आहे. परंतु तरीही त्याच्या वर नेहमीच संकट सुरूच असतं , कधी अति वृष्टीच तर कधी दुष्काळाच आणि त्यात खूप हाडाचे काडं करून , काबाड कष्ट करून , पोटाची खळगी करून दाताच पाणी गिळुन काळ्या रानात काळ्या मातीत सोन्या सारखं पीक उगवतो.भर उन्हात भर पावसात सतत तो कष्ट करत असतो.परंतू त्याने केलेल्या कष्टाला योग्य समाधानकारक फळ मिळत नाही. मायबाप सरकार योग्य तो पिकला हमीभाव देत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो आणि मग माय बाप सरकार शेतकऱ्यांच्या कुटुंबाला लाख रुपये देऊन तोंडाला पाणी पुसतात .आणि आज तर संपूर्ण जगात कोरोना विषाणू महामारीचे भयंकर संकट आले आहे. कोरोना विषाणू संसर्ग ला प्रतिबंध करण्यासाठी शासन पुरेपुर प्रयत्न करत आहे. तर एकीकडे माझा शेतकरी राजा शेतात पीक पिकवतोय. आणि संपूर्ण देशाला पुरवत आहे. आज सगळं थांबलं पण मात्र शेतकरी राजा थांबला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील प्रत्येक शेतकरी आज कोणाच्याही पोटाची खळगी न होता सगळ्यांना पोटभर अन्न धान्य मिळाल पाहिजेत म्हणून आपल्या शेतकरी राजाच्या थोडा विचार करण आवश्यक आहे. कारण सर्व बंद झाल तरी आज शेतकरी लढत आहे.तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकला योग्य भाव मिळत नाही.सर्व बंद झाल तरी काही फरक पडत नाही. मात्र , माझा शेतकरी बाप जर थांबला, त्याने शेती करणं बंद केलं तर सर्वांवर उपासमारीची वेळ येईल.माझा शेतकरी बाप त्याच्यावर कर्ज झाल की तो आत्महत्या करतो कारण कधी त्याला निसर्ग साथ देत नाही तर कधी मायबाप सरकार. त्याच्या पिकला योग्य भाव जर मिळत नसेल तर लाखो रुपये उत्पादनावर खर्च करून तयार केलेला माल कवडीमोल भावाने विकावं लागत आणि त्या वर तो म्हणतो.......
काय करू कुठे जाऊ काहीकळणसा मला !
विष घेऊ की गळाफास घेऊ काही कळणसा मला !
सोयबीन गेली , तुर गेली,कापसाची तर होळीच झाली !
गहू हरभऱ्याची ,तर या कोरोना न वाताहात केली !
सावकर च्या कर्जपायी घरदार शेती गहाण ठेवली !
सरकार माय बापा ने तर पुरतीच पाठ फिरावली !
पोरगी माझी लय गुणी
नांदायाला आली आता !
लग्नासाठी तीच्या पैशाचा नाय पता !
एवढं दुःख असताना हि माझा शेतकरी राजा, माझा बाप उन्हातान्हात , पाण्या पाऊसात संपूर्ण देशाला अन्न धान्य पुरावतो म्हणून .....
एक दिवा शेतकऱ्यांसाठी
लेखिका : कू. मयुरी प्रवीण अवताडे
रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम
क्लास - BSW दुसरे वर्ष , पार्ट 04 .