मंडप व्यावसायिकांना कोरोनाचा फटका!
मंडप व्यावसायिकांना कोरोनाचा फटका!
लाँकडाऊमुळे मार्चपासून व्यवसाय बुडाला
आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली
वाशिम : मरणशय्येवर पोहोचविणाऱ्या कारोनोचा मंडप डेकोरेटर्स , कँटरिंग,लाईट्स, साऊंड व मंगल कार्यालये आदी व्यवसायांनाही जबर फटका बसला आहे़. लाँकडाऊन व संचारबंदीमुळे प्रशासनाने मार्च महिन्यापासूनच लग्नसोहळ्यांवर बंदी आणली आहे़ परिणामी, सदर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले असून आर्थिक नियोजनही कोलमलडले आहे़ पूर्ण लग्नसराईचा सिझनच हातातून गेल्यामुळे वर्षभराचा आर्थिक ताळेबंद जुडवावा कसा असा प्रश्न मंडप व्यावसायीकांसमोर उभा ठाकला आहे़.
दरवर्षी मार्च महिन्यापासून लग्नसराईला धुमधडाक्यात प्रारंभ होतो़ मार्च पासून सुरू झालेली ही धूम जून महिन्यांपर्यंत कायम असते़ जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची मंगल कार्यालये गर्दीने गजबजून गेलेली असतात. यंदा मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यातच यात्रोत्सव, लग्नसमारंभ आदी गर्दी जमणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले़ 23 मार्चपासून तर संचारबंदी व ‘लॉकडाउन’ सुरू करण्यात आला आहे़ परिणामी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये होणारे लग्नकार्यदेखील आपसुकच रद्द झाले आहेत.याचा फटका मंडप, डेकोरेशन, साऊंड, कँटरर्स, स्वयंपाकी, मंगलकार्यालये आदी व्यावसायीकांना बसला आहे़ सदर व्यावसायीक साधारणपणे फेबु्रवारीपासून सुरू होणाºया सिझनच्या भरवश्यावर वर्षभराचे आर्थिक नियोजन करून ठेवत असतात़ त्यातूनच त्यांचे वर्षभराचे कर्ज परतफेडीचे हप्ते, मजुरांचे पगार यासह इतर आवश्यक खर्चाचे बजेट असते़ यंदा मात्र ऐन लग्नसराईच्या सिझन मध्ये व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत़ परिणामी, सदर व्यावसायीकांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून वर्षभर व्यवहारांचे चक्र्र चालवावे कसे या चिंतेने त्यांना ग्रासले आहे़ शासनाने मार्च, एप्रिल व मे महिन्याच्या कर्जाचे हप्ते पुढे ढकलेले आहेत़ परंतु, या व्यावसायींकांना तर या तिन महिन्यात झालेल्या कमाईवरच वर्षभराच्या हप्त्यांची तजविज करून ठेवावी लागते़ मात्र, कमाईच बुडाल्यामुळे हप्ते चुकवावे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे़.
मंडप व्यावसायीकांना शासनाच्या आधाराची गरज
मंडप, डेकोरेशन, कँटरर्स, साऊंड आदी व्यावसीयाकांना आता खºया अर्थाने शासनाच्या आधाराची गरज निर्माण झाली आहे़ वर्षभराची आर्थिक पुंजीच बंद झाल्यामुळे सदर व्यासायीक हवालदिल झाले आहेत़ किंबहुना परिस्थितीत सुधारणा न झाल्यास हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे शासनाने या व्यावसायीकांना आर्थिक पँकेज,कर्ज हप्त्यांमध्ये सवलत, जीएसटी, विजदेयकांमध्ये सुट आदी सवलती देण्याची मागणी या व्यावसायीकांमधून पुढे येत आहे़
प्रतिक्रीया
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लाँकडाऊन व संचारबंदीमुळे लग्नसमारंभ पूर्णपणे बंद आहेत़ याचा फटका आम्हा व्यावसायीकांना बसला असून आमचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे़ लग्नसराईच्या चार महिन्यात होणाºया उत्पन्नावर आमचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते़ कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते, जीएसटी, इलेक्ट्रीक बिल, मेंटनंस आदी वर्षाचे यातून भागावावे लागतात़ यंदा मात्र उत्पन्नच बुडाल्यामुळे आमच्या समोर समस्यांचा मोठा डोंगर उभा झाला आहे़ शासनाने मदत करावे हीच अपेक्षा आहे़
- संतोष शिंदे
संचालक, ओम मंडप अँण्ड डेकोरेटर्स
वाशीम